बहुजननामा ऑनलाईन टीम – मोदी सरकारने आता रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. रस्त्यावर असलेल्या सरकारी दुकानातून उत्तरखंडातल्या रेशनकार्ड लाभार्थ्यांना रेशन घेता येणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अॅक्ट(एनएफएसए) अंतर्गत रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देण्याच्या तयारीत आहे. उत्तराखंडातील २३ लाख लाभार्थ्यांना या व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही सरकारी दुकानातून धान्य घेता येणार आहे.
अन्नधान्याचा लाभ प्रत्येक गल्ली – बोळातल्या दुकानातून सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अंतर्गत घेता येणार आहे. ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये एनएफएसएअंतर्गत रेशन कार्ड आणि सदस्यांची माहिती टाकली जाणार आहे. जेणेकरून स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ई – पास मशिनला हे सॉफ्टवेअर लिंक होणार आहे.
कशी असेल प्रक्रिया
पोर्टेबिलिटीअंतर्गत लाभार्थाला दुसऱ्या जागेवरच्या रेशनिंगच्या दुकानात जाऊन बायोमेट्रिक सिस्टीमद्वारे थंम इंप्रेशनच्या माध्यमातून रेशन मिळते. तसेच पीडीएस सिस्टीम सॉफ्टवेअर सरकारने अपडेटही केले आहे. जर एखाद्या ग्राहकाने लागोपाठ तीनदा जर अशा दुकानातून ऍन- धान्य खरेदी केल्यास तो नोंदणीकृत होणार असून, त्याला धान्याचा पुरवठा होणार आहे.