बहुजननामा ऑनलाईन टीम – पाकिस्तान पोलिसांनी पंजाब प्रांतातून एका भारतीय गुप्तहेरला अटक केल्याचा दावा केला आहे. अटक केलेला तरुण भारतीय नागरिक राजू लक्ष्मी असल्याचे पाकिस्तानी पोलिसांचे म्हणणे आहे. जो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हेरगिरी करीत होता. बलुचिस्तान प्रांतातून डेरा गाझी खान परिसरामध्ये फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पाकिस्तानी पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीसह लक्स कोझी बनियानचा फोटोही जाहीर केला आहे. त्यात मेड इन इंडिया असे लिहिले आहे. ज्यावरून पाकिस्तान दावा करीत आहे की, अटक केलेला तरुण भारतीय आहे.
पाकिस्तानच्या या दाव्याची इंटरनेटवर जबरदस्त खिल्ली उडवली जात आहे. लोक म्हणतात की, पाकिस्तानने एका गरीब तरूणाला अटक केली कारण त्याने लक्स कोझी बनियान घातला होता.
लोक म्हणतात, लक्स कोझी बनियान पाहून पाकिस्तानी पोलिसांना समजले की, तो तरुण भारतीय गुप्तहेर आहे. आता ICJ मध्ये जाऊन पाकिस्तान लक्स कोझी यांचे पुरावे सादर करेल.
पाकिस्तानी मिडिया ही या युवकाला भारतीय गुप्तहेर म्हणत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भारताने आपला गुप्तहेर बलूचिस्तानमध्ये पाठविला आहे पण पाकिस्तानच्या सतर्क पोलिसांनी त्याला पकडले. पाकिस्तान नेहमीच भारतीय हेर पकडण्याचा दावा करतात आणि निरपराध लोकांना पकडून त्याचा नेहमीच छळ करतात.
यापूर्वी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेर म्हणून अटक केली होते. पाकिस्तानचा दावा आहे की, त्याच्या सुरक्षा दलांनी मार्च २०१६ मध्ये बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. सध्या ही बाब आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू आहे.