मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,510 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचे सोन्याचे दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,130 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,650 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,510 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,510 रुपये
आजचा चांदीचा भाव – 60,400 रुपये (प्रति किलो).
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 8 january 2022 sonya chandi che dar
Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक