नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office MIS | पोस्ट ऑफिस नेहमीच आकर्षक आणि विश्वासार्ह योजना देत आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांप्रमाणे येथे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. येथे आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते उघडून गुंतवणूक करू शकता आणि दरमहा 2500 रुपये कमावू शकता. पोस्ट ऑफिसच्या MIS स्कीमबद्दल जाणून घेऊया. (Post Office MIS)
MIS वर किती व्याज मिळते –
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये एकरकमी पैसे गुंतवून मिळालेल्या व्याजातून मुलाची ट्यूशन फी भरू शकता. पोस्ट ऑफिसमधून एमआयएस स्कीमवर 6.6 टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही कशी गुंतवणूक करू शकता ते जाणून घेवूयात.
खाते कुठे आणि कसे उघडायचे
कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिसचे एमआयएस खाते उघडू शकता.
या अंतर्गत, किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील.
सध्या या योजनेअंतर्गत 6.6% व्याजदर आहे. जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे खाते त्याच्या नावाने उघडू शकता आणि जर ते कमी असेल तर त्याऐवजी पालक हे खाते उघडू शकतात. या योजनेची मुदत 5 वर्षांची आहे. त्यानंतर ते बंद केले जाऊ शकते.
कसे होईल कॅलक्युलेशन –
जर मुल 10 वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर दर महिन्याला तुमचे व्याज सध्याच्या 6.6 टक्के दराने 1100 रुपये मिळेल. पाच वर्षांत हे व्याज एकूण 66 हजार रुपये मिळेल आणि शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा रिटर्न मिळेल.
अशा प्रकारे, एका लहान मुलासाठी, तुम्हाला 1100 रुपये मिळतील जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी वापरू शकता. ही रक्कम पालकांसाठी चांगली मदत होऊ शकते. (Post Office MIS)
तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात –
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तीन लोक एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकतात. जर तुम्ही या खात्यात 3 लाख 50 हजार रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 1925 रुपये मिळतील.
Web Title :- Post Office MIS | post office open account of children above 10 years every month there income of 2500 rupees
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव