Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाल्याचं दिसत आहे. आजही सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price) 49,519 रुपये पर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात (Silver Price) 932 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर चांदीचा भाव 63,827 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात वाढ झाल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोने दरात तेजी आली आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत होतं. आता मात्र, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात ओव्हरनाइट तेजी आली आहे आणि रुपयांतही मोठी घसरण झालीय. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशी माहिती एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल (Tapan Patel) यांनी दिली. (Gold Silver Price Today)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येणार आहे. त्याचबरोबर सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
काय आहेत सोन्या-चांदीचे दर?
आजचा सोन्याचा भाव – 49,519 रुपये (ग्रॅममध्ये)
आजचा चांदीचा भाव – 63,827 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold rate high above 49500 silver increase by 932 check latest gold silver rate
Comments are closed.