Tu Tevha Tashi | ‘या’ मराठमोळी अभिनेत्रीचे 20 वर्षांनंतर पुनरागमन; नाव वाचून व्हाल…

Tu Tevha Tashi | after 20 years this marathi actress makes a comeback on small screen

बहुजननामा ऑनलाइन टीम – Tu Tevha Tashi | ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील येत्या मालिकेने (Series) प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे. या मालिकेचा केवळ टिझर रिलीज झाला आहे. असं असतानाही या मालिकेची चर्चा शिगेला पोहचली आहे. या मालिकेमधून प्रथमच स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) यांची जोडी लहान पडद्यावर प्रेक्षकांसमोर असणार आहे. तर या मालिकेत स्वप्नील सौरभची (Saurabh) तर शिल्पा अनामिका दीक्षितची (Anamika Dixit) भूमिका साकारणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi) हि गोष्ट अव्यक्त प्रेमाची आहे. 20 मार्च पासून 8 वाजता ही मालिका (Series) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, “मेघ दाटले या मालिकेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर ‘तू तेव्हा तशी’ मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे. मधल्या काळात मी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कॅमिओ केले पण पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय.” असं ‘तू तेव्हा तशी’ या आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना शिल्पाने (Shilpa Tulaskar) सांगितलं आहे. (Tu Tevha Tashi)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

तसेच पुढे ती म्हणाली, ”स्वप्नील आणि मी याआधी एकत्र काम केलं आहे पण तू तेव्हा तशी मधून पहिल्यांदांच प्रेक्षक आम्हाला प्रमुख जोडी म्हणून पाहू शकतील. स्वप्नील सोबत खूप वेळानंतर पुन्हा एकदा काम करतेय त्यामुळे एकत्र काम करताना ऑन-स्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम असते. या मालिकेचं कथानक खूपच वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररित्या मांडण्यात आलं आहे जे प्रेक्षकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे.”

 

 

Web Title :- Tu Tevha Tashi | after 20 years this marathi actress makes a comeback on small screen

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर

 

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडेचा ड्रेस कॅमेऱ्यासमोर घसरला; ओप मोमेंटचा Video व्हायरल..

 

Bullock Cart Race Pune | 75 वर्षांच्या नानांचा नादच खुळा, शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा नानांच्या घोडेस्वारीने वेधून घेतले सर्वांचे लक्ष