बहुजननामा ऑनलाइन – मागील सत्रात जोरदार घसरण झाल्यानंतर आज भारतात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर दहा ग्रॅम 0.14 टक्क्यांनी वाढून 50,544 रुपये झाला, तर चांदीचा वायदा 0.9 टक्क्यांनी वाढून 61,867 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 2.4 टक्क्यांनी किंवा 1,200 रुपयांनी खाली आला होता, तर चांदी 9.3 टक्क्यांनी म्हणजेच 6,300 रुपयांनी स्वस्त झाली होती.
जागतिक बाजारपेठेत इतकी आहे किंमत
जागतिक बाजारपेठेत मागील सत्रात सोन्याच्या किंमती तीन टक्क्यांहून अधिक घसरल्यानंतर आज वाढ झाली. स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी वधारला आणि 1,918.20 डॉलर प्रति औंस झाला. मागील सत्रात, अमेरिकन डॉलर जवळजवळ सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठल्यामुळे सोने एका महिन्यात सर्वाधिक घसरले होते, म्हणजेच 1,882.70 डॉलर. मजबूत डॉलर अन्य चलनांच्या धारकांसाठी सोने अधिक महाग करते.
अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी 1.1 टक्क्यांनी वाढून 25 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.6 टक्क्यांनी वाढून 886.20 डॉलर आणि पॅलेडियम 0.5 टक्क्यांनी वाढून 2,285.44 डॉलर झाली आहे.
आतापर्यंत किंमतीत 26 टक्के वाढ
राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याचा सुरक्षित गुंतवणूकी म्हणून वापर केला जातो, यंदा ही किंमत सुमारे 26 टक्क्यांनी महागली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची आयात वाढून 3.7 अब्ज डॉलरवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1.3 अब्ज डॉलर होती. चीननंतर भारत दुसर्या क्रमांकाचे सोन्याचे खरेदीदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी लागतो.