नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा काळ अजूनही कायम आहे. दिल्ली सराफ बाजारात आज ३१ मार्च २०२१ रोजी सोन्याच्या भावात १८८ रुपये प्रति १० ग्रॅमने घसरण झाली आहे. काही दिवसांपासून चालू असलेल्या चढ-उतारात सोन्याचा भाव आज ४४,००० रुपयांपेक्षा खाली जाऊन थांबला आहे, तेच चांदीच्या किंमतीतही घसरण होत असताना दिसत आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफ बाजारात सोने ४४,११३ रुपये प्रति १० ग्रॅम वर थांबले. तेच चांदी ६३,२१२ रुपये प्रति kg वर थांबले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या किंमती स्थिर आहेत.
सोन्याचा नवीन दर (३१ मार्च २०२१)
दिल्ली सराफ बाजारात बुधवारी सोन्याच्या दारात ११८ रुपये प्रति १० ग्रॅम इतके कमी झाले. राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ ग्रॅम शुद्धता म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा नवीन भाव आता ४३,९२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. या आधी व्यापारी सत्रात सोने ४४,११३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. तेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती आज घसरून १६८४ डॉलर प्रति औसवर आल्या आहेत. दिल्ली सराफ बाजारात सोने ७ ऑगस्ट २०२० च्या सर्वोच्च स्थान ५७,००८ रुपयांवरून १३,०८३ प्रति १० ग्रॅम घसरले आहे.
चांदीचा नवीन भाव (३१ मार्च २०२१)
चांदीच्या किंमतीत आज ७७१ रुपये प्रति kg ची घसरण नोंदवली गेली आहे. दिल्ली सराफ बाजारात बुधवारी चांदीचा दर कमी होऊन ६३,४४१ प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि हा २४.०९ डॉलर प्रति औसवर आहे. दिल्ली सराफ बाजारात चांदीचा दर ऑगस्ट २०२० च्या सर्वोच्च स्थान ७७,८४० रुपयांवरून १५,३९९ रुपये प्रति किलोग्रॅम घसरला आहे.
सोन्यात घसरण का झाली?
HDFC सिक्योरिटीजचे सिनियर ऍनालिस्ट तपन पटेल यांच्या मतानुसार, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या अपेक्षेमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती भारतीय सराफ बाजारात घसरत आहेत. आज डॉलरच्या तुलनेत रुपया २० पैशांनी घसरला आणि ७३.५८ च्या पातळीवर उघडला. डॉलरच्या मजबुतीदरम्यान न्यूयॉर्कमधील सध्याच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये लोकांनी जोरदार विक्री केली.