नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 26 जुलै 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) तेजीचा कल होता. यामुळे सोने 46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे जाऊन बंद झाले. तर, चांदीच्या किंमतीत सुद्धा उसळी (Gold Price Today) नोंदली गेली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील व्यवहाराच्या सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने 46,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 65,684 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज तेजी नोंदली गेली, तर चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही.
सोन्याची नवीन किंमत
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात 169 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. राजधानी दिल्लीत (Delhi) 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आज 46,753 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढून 1,808 डॉलर प्रति औंसवर पोहचली. डॉलरच्या तुलनेत 4 पैशांची घट झाली आणि सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान भारतीय चलन 74.44 च्या स्तरावर पोहचले.
चांदीचा नवीन भाव
चांदीच्या किंमतीत सुद्धा आज तेजी दिसून आली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचे दर 396 रुपयांच्या वाढीसह 66,080 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला
नाही आणि ती 25.32 डॉलर प्रति औंसवर पोहचली
सोन्याच्या किंमतीत का आली तेजी
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण आणि अमेरिकन बाँडच्या यील्डमधील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदली गेली.
Web Title :- Gold Price Today | gold price today gold rise to rupees 46753 per 10 gram 26 july 2021 check latest rates investment and return
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज