Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंट बोर्डाचा माजी नगरसेवक विवेक यादवनं सीम कार्ड दिली वाशीच्या खाडीत फेकून, पोलीस कोठडीत वाढ

pune crime former bjp cantonment board corporator vivek yadav in trouble pc till 28 july kondhwa police

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – स्वत:वर झालेल्या गोळीबाराचा (Pune Crime) बदला घेण्यासाठी एकाच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या (former bjp pune cantonment board corporator vivek yadav) पोलिस कोठडीत २८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरून (Gujarat-Rajasthan border) अटक (Pune Crime) केली होती.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

विवेक यादव (Vivek Yadhav, Pune) (वय ३८, रा. वानवडी) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी राजन जॉनी राजमनी (वय ३८, रा. कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकूब शेख (वय २७, रा. वाकड) या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, या तिघांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू गवळी याने पूर्ववैमनस्यातून विवेक यादव याच्यावर २०१६ मध्ये गणेशोत्सवादरम्यान गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी विवेक यादवने सराईत गुन्हेगार राजन राजमनी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकूब शेख या दोघांना प्रत्यक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉल, चॅटिंगगद्वारे बबलू गवळीच्या (Bablu Gavli) खुनाची सुपारी दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta), अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण (additional commissioner of police namdev chavan), पोलिस उपायुक्त नम्रता पाटील (deputy commissioner of police namrata patil), सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे (assistant commissioner of police rajendra galande) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढव्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील (senior police inspector sardar patil), पोलिस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद (Police Inspector Shabbir Syed), तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक पी.यु. कापुरे (Police Sub Inspector P.U. Kapure), पोलिस कर्मचारी सुशिल धिवार, योगेश कुंभार, ज्योतिबा पवार, पांडुळे आणि मिसाळ यांच्या पथकाने आरोपी विवेक यादवला गुजरात-राजस्थान सीमेवरून अटक केली होती.

गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल कोठून आणले? आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध घेण्यासाठी. तसेच गुन्ह्यातील आणखी दोन पिस्तूल जप्त करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकील ज्योती वाघमारे (Public Prosecutor Jyoti Waghmare) यांनी केली. या प्रकरणात भा.द.वि कलम ३०२ (खून) चा समाविष्ट करावे, असा अर्ज गवळीतर्फे ॲड पूजा अगरवाल (Adv. Pooja Agarwal) यांनी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर २८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

सिमकार्ड दिली फेकून :
यादव याच्याकडून दोन मोबाईल आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.
मोबाईलमधील सिमकार्ड त्याने मुंबईतील वाशी येथील खाडीत फेकून दिले आहेत,
असे पोलिस तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे त्यावर पुरावा नष्ट केल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- pune crime | former bjp cantonment board corporator vivek yadav in trouble, pc till 28 july, kondhwa police

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

Tokyo Olympics 2020 | मीराबाई चानूला मिळू शकतं सिल्व्हरच्या बदल्यात गोल्ड मेडल ! जाणून घ्या का आणि कसे

Ratnagiri News | सॅल्यूट ! डेपो व्यपस्थापकांनी 7.5 लाखांची रोकड घेऊन ST च्या टपावर काढले तब्बल 10 तास

New Rules Salary | 1 ऑगस्टपासून सॅलरी संबंधीचे बदलतील ‘हे’ नियम, आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा अकाऊंटमध्ये येईल पगार