नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नसराईत सोन्याच्या दरात (Gold Price Today) सतत घसरण दिसून येत आहे. तर, चांदीचा दर (Silver Price Today) सुद्धा कमी होत आहे. दिल्ली सराफा बाजारात 3 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात 196 रुपयांची घट नोंदली गेली.
याशिवाय चांदीच्या किमतीत आज 146 रुपयांची घसरण झाली. (Gold Price Today)मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,777 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर चांदी 60,024 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोने घसरून व्यवहार करत होते. तर चांदीमध्ये मोठा बदल झाला नाही. (Gold Price Today)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 196 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. यामध्ये राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,581 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या किमतीत घट झाली आणि ती 1,767 डॉलर प्रति औंसवर पोहचली.
चांदीचा आजचा दर (Silver Price Today)
चांदीच्या दरात आज घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी चांदीच्या दरात 146 रुपयांची किरकोळ घट झाल्यानंतर 60 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली पोहचली. राष्ट्रीय राजधानीत आज चांदीचा दर 59,878 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 22.30 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.
सोन्याच्या दरात का झाली घट?
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सिनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, आज कॉमेक्स (COMEX) वर सोन्याच्या हाजीर भावात (Spot Gold Prices) घसरण नोंदली गेली. यामुळे भारतीय बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात घट नोंदली गेली.
Web Title :- Gold Price Today | gold price today 03 december 2021 gold rate down silver rate also dip check latest price
Anemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर आजाराचा आहेत संकेत, अजिबात करू नका दुर्लक्ष
Nia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला नाही माहित माझ्याकडे काम का येत नाही’
Tehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची बदली