पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – जादा काम केल्याचे पैसे देण्यास नकार दिल्याने कामगाराने रागाच्या भरात दुकानाला आग (shop fire) लावल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील थेरगाव येथे गुरुवारी (दि.2) पहाटे तीन वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) कामगारावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनवणे (वय-51 रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश शंकरराव सोनकांबळे (रा. खंडरे गल्ली, ता. भालकी, जि. बिदर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कामगाराने लावलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांच्या मुलाचे थेरगाव येथील दत्त नगरमध्ये ओम साई कुशन वर्क नावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी प्रकाश सोनकांबळे हा काम करत होता. त्याने मालकाकडे कामाचे आगाऊ पैसे मागितले (pay advance) होते. मात्र, मालकाने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन आरोपी प्रकाश याने गुरुवारी पहाटे दुकान आतून बंद केले आणि शिवीगाळ करत दुकानाला आग लावली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | employer did not pay advance work worker set shop fire in pimpri chinchwad
Pune Crime | PMPML बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणारा परराज्यातील सराईत गजाआड; 38 मोबाईलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडेला जामीन
EPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या योजना