बहुजननामा ऑनलाइन टीम – शुक्रवारी देशांतर्गत वायदा बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून, चांदीच्या भावात घसरण दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये डिसेंबर वायदाच्या सोन्याच्या किमती शुक्रवारी सकाळी 0.18 टक्क्यांनी किंवा 90 रुपयांनी वाढून 10 ग्रॅम प्रति 50,690 रुपयांच्या पातळीवर दिसून आल्या.(Gold Price Today) याव्यतिरिक्त 5 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 50,785 रुपयांवर होते, तो 0.22 टक्क्यांनी किंवा 112 रुपयांनी वाढला.
देशांतर्गत वायदा बाजारात शुक्रवारी सकाळी चांदीच्या दरात घसरण दिसून आली. एमसीएक्सवर, शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता चांदीचे दर 219 रुपयांनी घसरून 62,520 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले.
जागतिक स्तरावर सोन्याचे भाव
शुक्रवारी सकाळी जागतिक पातळीवर सोन्याच्या वायदा आणि स्पॉटच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. ब्लूमबर्गच्या मते, शुक्रवारी सकाळी सोन्याचा जागतिक वायदा भाव प्रति औंस 1,877.10 डॉलरवर दिसून आला, तो कॉमेक्सवर 0.20 टक्के किंवा 3.80 डॉलर होता. याव्यतिरिक्त सोन्याची जागतिक किंमत सध्या 0.17 टक्के किंवा 3.14 डॉलर वाढीसह प्रति औंस 1,879.97 डॉलरवर आहे.
जागतिक स्तरावर चांदीचे दर
जागतिक स्तरावर चांदीच्या वायदा किमतींमध्ये वाढ आणि स्पॉटच्या किमतीत घट दिसून आली आहे. ब्लूमबर्गच्या मते, शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर डिसेंबर वायदा चांदीचे दर 0.08 टक्क्यांनी किंवा 0.02 डॉलर प्रति औंसच्या तेजीसह 24.33 डॉलर दिसून आले. त्याशिवाय चांदीची जागतिक पातळीवरील किंमत 0.12 टक्क्यांनी किंवा 0.03 डॉलरने घसरुन प्रति औंस 24.25 डॉलरवर ट्रेंड करताना दिसली.