बहुजननामा ऑनलाईन- एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी सर्व अधिकार दिलेले असतात, जसे देशाच्या पंतप्रधानांना पुर्ण देशासाठी दिले जातात. कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री राज्यविधानसभेतील सदस्यांचा नेता असतो. तर पंतप्रधान लोकसभा संसदेतील सदस्यांचा नेता असतो.
भारत सरकार या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामासाठी वेतन देत असते. पंतप्रधानांना संसदेच्या सदस्याच्या स्वरुपात १.६ लाख रुपये वेतन आणि अन्य भत्तेही दिले जातात. तसेच भारताच्या राष्ट्रपतींना ५ लाख रुपये प्रति महिना वेतन आणि अन्य भत्तेही मिळतात. हे भारतातील इतर कोणत्याही अधिकाऱ्याला मिळणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असतात. विशेष बाब म्हणजे तेलंगानाच्या मुख्यमंत्र्यांना इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत जास्त वेतन मिळते.
देशभरातील राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळणारे वेतनावर एक नजर टाकू.
तेलंगाना ४ लाख १० हजार रुपये
दिल्ली ३ लाख ९० हजार रुपये
उत्तरप्रदेश ३ लाख ६५ हजार रुपये
महाराष्ट्र ३ लाख४० हजार रुपये
आंध्रप्रदेश ३ लाख ३५ हजार रुपये
गुजरात ३लाख २१ हजार रुपये
हिमाचलप्रदेश ३ लाख १० हजार रुपये
हरियाणा २ लाख ८८ हजार रुपये
झारखंड २ लाख ७२ हजार रुपये
मध्यप्रदेश २लाख ५५ हजार रुपये
छत्तीसगड २ लाख ३० हजार रुपये
पंजाब २ लाख ३० हजार रुपये
गोवा २ लाख २० हजार रुपये
बिहार २ लाख १५ हजार रुपये
पश्चिम बंगाल २ लाख १० हजार रुपये
तमीळनाडू २ लाख ५ हजार रुपये
कर्नाटक २ लाख रुपये
सिक्कीम १ लाख ९० हजार रुपये
केरळ १लाख ८५ हजार रुपये
राजस्थान १ लाख ७५ हजार रुपये
उत्तराखंड १लाख ७५ हजार रुपये
ओडीसा १लाख ६० हजार रुपये
मेघालय १लाख ५० हजार रुपये
अरुणाचल प्रदेश १ लाख ३३ हजार रुपये
आसाम १लाख २५ हजार रुपये
मणिपुर १ लाख २० हजार रुपये
नागालॅंड १ लाख १० हजार रुपये
त्रिपुरा १लाख ५ हजार ५०० रुपये
वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की भारतीय राज्य त्यांच्या मुख्यंमंत्र्यांना चांगले वेतन देत आहे. तर उत्तर पुर्वेकडील गरीब राज्य त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कमी वेतन दिले जात आहे. ही सुची वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपुर्ण असल्याने विद्यार्थ्यांनी ही सुची लक्षात ठेवणे गरजेचे आहे.