मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- विधानसभा तोंडावर असताना केंद्राने लागू केलेल्या मोटर वाहन अधिनियमाविरोधात देशात मात्र नाराजीचे वातावरण आहे. परंतु राज्य सरकार पुढील महिन्यात राज्यात हे अधिनियम लागू करु शकतात. राज्य सरकारने यासंबंधित कायदा आणि न्यायालयाकडून या संबंधित मत मागवले आहे.
मोटार वाहन कायद्याविरोधात सध्या वाहन चालकांमध्ये अत्यंत नाराजी आहे. राज्यात लवकर विधानसभा निवडणूका पार पडणार आहेच. परंतु राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार ही जोखीम उचलू इच्छित नाही. नितीन गडकरी यांची हे नियम बनवण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. परंतु असे असताना राज्यात हे नियम लागू करण्याची जोखीम राज्य सरकार उचलू इच्छित नाही.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे वाहतूक नियम लागू करण्याच्या मताचे आम्ही नाही, यासंबंधित कायदा आणि न्यायालय विभागाकडून मत मागवण्यात येईल. त्यानंतर वाहतूक नियमांच्या दंडाचे दर ठरवण्यात येतील. राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात हे निर्णय लागू करण्याचा निर्णय अजून झालेला नाही.