नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे स्थानकांवर त्वरित वैद्यकीय अहवाल देण्यासाठी भारतीय रेल्वेने आरोग्य एटीएम सुरू केले असून रेल्वेच्या या उपक्रमानंतर बर्याच प्रवाशांना त्यांची वैद्यकीय तपासणी अगदी कमी किंमतीत करता येणार आहे. रेल्वेने या आरोग्य एटीएमला ‘न्यू इनोव्हेटिव्ह अँड आयडिया स्कीम’ अंतर्गत स्थापित केले असून नॉन-फेयर रेव्हेन्यू जनरेट केला जाऊ शकतो.
२०१०-२०११ साली पहिल्यांदा नॉन-फेअर रेव्हेन्यूची सुरुवात केली असताना बरीच वर्षे लोटली तरी रेल्वेला यातून काही खास मिळाले नव्हते. पण गेल्या वर्षी या उपक्रमातून रेल्वेने चांगली कमाई केली असून रेल्वेच्या नागपूर स्थानकात एका प्रवाशाने सांगितले होते. त्या अहवालात ‘मला हेल्थ एटीएमच्या मदतीने काही सेकंदातच वैद्यकीय अहवाल मिळाला’, असे त्या प्रवाशाने सांगितले आहे.
तसेच अवघ्या काही सेकंदातच त्याला मशीनकडून एक छापलेली स्लिप मिळाली, ज्यात त्याची वैद्यकीय माहिती होती. या मशीनच्या सहाय्याने त्यांना त्यांच्या मास इंडेक्स आणि हायड्रोजन पातळीविषयी सहज माहिती मिळाली. त्याच्या मदतीने त्यांना समजले की, त्याचे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य असून शरीरात प्रथिनांचा अभाव आहे. फक्त ६० रुपये खर्च करून रेल्वे प्रवाशाला ही सर्व माहिती मिळाली. एखाद्या पॅथॉलॉजिस्टकडे गेल्यास या कामासाठी त्याला किमान २०० रुपये द्यावे लागतील, असेही त्या प्रवाशाने सांगितले.
रेल्वेने त्यांच्या अहवालात त्वरित वैद्यकीय अहवाल देण्यासाठी या यंत्रांमध्ये पॉईंट ऑफ केअर डिव्हाइसेस आणि सॉफ्टवेअर स्थापित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. तसेच या हेल्थ एटीएमच्या मदतीने एकावेळी १६ पद्धती तपासल्या जाऊ शकतात.