Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ पुरस्काराने गौरव; गौतमीला मायभूमीतून मिळाले बळ

Gautami Patil | jai khandesh gautami patil honored with khandesh kanya award by jaikumar rawal

बहुजननामा ऑनलाईन – नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या नृत्यावर टीकाही केली गेली होती. यामुळे तिला ट्रोलही केले गेले होते. यामुळे गौतमी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. एवढेच नाही तर गौतमी तिच्या नृत्यामुळे वादात देखील अडकली होती. या प्रकारचे वाद निर्माण झाल्यावर गौतमीने (Gautami Patil) जाहीर माफी देखील मागितली होती. आता गौतमीचा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गौतमी तिच्या नृत्यामुळे वादात अडकली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीत गौतमी पाटीलचा उल्लेखही झाला होता. यानंतर गौतमीने राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बद्दल आदर व्यक्त करत आपण लावणी कलाच यापुढे सादर करणार असल्याचेही स्पष्ट केले होते. आता गौतमीला मायभूमीतून बळ मिळाले आहे. खान्देश कन्या म्हणून तिचा गौरव करण्यात आला आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.

 

 

गौतमी पाटीलने (Gautami Patil) इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
यावेळी तिने माजी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार देखील मानले आहे.
पोस्ट शेअर करत गौतमीने कॅप्शन मध्ये म्हटले की, “माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते खान्देश कन्या
म्हणून माझा गौरव करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. अशाच पद्धतीचा मायेचा हात सदैव
माझ्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…… जय खान्देश”. सध्या गौतमीची ही पोस्ट सोशल मीडियावर
मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. या कार्यक्रमात जयकुमार रावल यांनी गौतमीचे कौतुकही केले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या पुरस्कारानंतर गौतमीवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. गौतमी ही मूळची धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यातील आहे. ती तिच्या नृत्यामुळे महाराष्ट्रभर फेमस आहे. तिची एक अदा पाहण्यासाठी युवा वर्ग तिच्यावर फिदा होत असतात. गौतमी शिंदखेड तालुक्यातील असल्यामुळे या भव्य कार्यक्रमात तिचा खान्देश कन्या म्हणून गौरव करण्यात आला. गौतमीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीचे इंस्टावर फोटोज आणि व्हिडिओज नेहमीच वायरल होत असतात.

 

 

Web Title :-  Gautami Patil | jai khandesh gautami patil honored with khandesh kanya award by jaikumar rawal

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा, चिंचवडमधील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्यक्ष मतदान करण्यावर भर, टपाली मतदानाकडे फिरवली पाठ

Sandeep Pathak | सेटवर मिळालेल्या वागणूकीबाबत संदीप पाठकने व्यक्त केली खंत; म्हणाला…

Ajit Pawar | मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे, कसब्यात परिवर्तन अटळ- अजित पवार