Sandeep Pathak | सेटवर मिळालेल्या वागणूकीबाबत संदीप पाठकने व्यक्त केली खंत; म्हणाला…

Sandeep Pathak | marathi actor sandeep pathank first time shared his experience about bad treatment on sets

बहुजननामा ऑनलाईन – मराठमोळा अभिनेता संदीप पाठकला (Sandeep Pathak) आज प्रत्येक जण त्याच्या अभिनयामुळे ओळखतात. आज संदीपने त्याच्या अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. मनोरंजन जगात त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. मात्र आजपर्यंत त्याचा हा प्रवास कदाचितच सोपा नव्हता. तर सुरुवातीच्या काळात संदीप (Sandeep Pathak) जेव्हा मुंबईत अभिनयासाठी आला तेव्हा त्याला अनेक वाईट अनुभव आल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

संदीप हा मूळचा मराठवाड्याचा, अभिनयाची आवड असल्याने तो मुंबईतला आला. गेली 22 वर्ष तो मुंबईतच राहतो. संदीपने एका मुलाखतीत सुरुवातीच्या काळात त्याला आलेले अनुभव त्यांनी शेअर केले आहे. या मुलाखतीमध्ये संदीपला “सेटवर कधी अपमानास्पद वागणूक मिळाली आहे का?” असे विचारले असता संदीप म्हणाला, “अर्थातच ती मिळायला हवी…. अहो गरजेचे असते… मोठा होण्यासाठी अशी वागणूक फार गरजेचे असते. सुरुवातीच्या काळात बसायला खुर्ची देखील मिळायची नाही. दहा वेळा चहा मागितल्यानंतर तोंडावर चहा फेकून मारणे असे अनेक किस्से घडले आहेत. पैसे मागायला गेलो की अशी वागणूक हमखास मिळायची. सिरीयलचे निर्माते हे हिंदी वाले असायचे आपले राहिलेले असतात 1200 रुपये आणि 1500 रुपये तर प्रतिदिनाप्रमाणे ते पाच ते सहा हजार होतात. हे पैसे आपण मागायला आत गेल्यावर त्यांचाच नोकर येऊन म्हणतो, ए चलो उठो, उठो, बाहर बैठो चलो. असं अनेकदा झालेलं आहे.’

 

 

https://www.instagram.com/reel/Cowz2xrpMAA/?utm_source=ig_web_copy_link

 

संदीपने आजवर अनेक मालिका, सिनेमे तसेच नाटकांमध्ये काम केले आहे. ‘वऱ्हाड निघालं लंडनला’
हे आधीच गाजलेले नाटक पुन्हा साकारण्याची संधी संदीपला (Sandeep Pathak) मिळाली आणि या
नाटकामुळेच संदीपला एक वेगळी ओळख मिळाली आहे. संदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या नवनवीन प्रोजेक्टची माहिती तो चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो.
याशिवाय संदीप आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर स्पष्टपणे भाष्य करत असतो.

 

Web Title :-  Sandeep Pathak | marathi actor sandeep pathank first time shared his experience about bad treatment on sets

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे, कसब्यात परिवर्तन अटळ- अजित पवार

Ajit Pawar | मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे, कसब्यात परिवर्तन अटळ- अजित पवार

Solapur Crime News | शेतजमीन नावावर न केल्याच्या रागातून 4 वर्षीय पुतणीची हत्या, सोलापूर हादरलं

Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!