औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करीत त्याला जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगराता घडली. याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलिसांनी अकाला अटक केली आहे. तर इतर ४ ते ५ जण फरार आहेत.
इम्रान पटेल (वय-२८) या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे. तर एकाला अटक केली आहे.
इम्रान पटेल हा शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास तो कामावरून घरी परत निघाला होता.शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता अचानक त्याला 8 ते 10 तरुणांच्या टोळक्याने अडवत त्याच्या दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. याचवेळी त्याला जय श्रीराम म्हणण्यासही भाग पाडले. त्यावेळी इम्रान तीन वेळा जय श्रीराम म्हटले. टोळके इम्रानला मारहाण करत असताना एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली. ही घटना सर्वत्र पसरल्याने एमआयएमचे कार्यकर्ते पोलीस चौकीत जमा झाले होते.