अहमदनगर बहुजननामा ऑनलाईन – निवडणूकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळी भाषणबाजी करणे माजी पोलीस उपअधिक्षकासह नवनिर्वाचित सरपंचाच्या चांगलीच अंगलट आली आहे. याप्रकऱणी माजी पोलीस उपअधिक्षक, नवनिर्वाचित सरपंच, एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि पॅनलचा प्रमुख यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
निवृत्त पोलीस उपअधिक्षक यादवराव रंभाजी आव्हाड, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच अनिल उर्फ महेश पांडूरंग आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आनंदा आव्हाड, त्यांच्या पॅनलचे प्रमुख किसन सावळेराम आव्हाड अशी गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश भानुदास आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.
नगर तालुक्यातील मजले चिंचोली गावात निवडणूकीच्या काळात हा प्रकार घडला आहे. निवडणूकीच्या काळात गावातील धार्मिक स्थळी भाषणबाजी केल्याची तक्रार निवडणूक निर्णय़ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी आचार संहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.