पुणे -बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड येथील दि सेवा विकास सहकारी बँकेमध्ये तब्बल २३८ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याविरुद्ध बँकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी, ग्राहक आणि बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यामुळे बॅंकेची विश्वसनीयता धोक्यात आली आहे.
दरम्यान असे अनेक बँक घोटाळे अनेक ठिकाणी उघडकीस आल्याचे आपण ऐकले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी नेमके पैसे ठेवायचे कुठं हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बँक पिंपरी चिंचवड शहरातील एक नामांकित बँक आहे. त्यामुळे या बँकेत ठेवीदारांच्या कोटींच्या ठेवी असतात. पण जर बँकेतील अधिकारी आणि पदाधिकारी जर असे घोटाळे करत असतील तर ठेवीदाराच्या ठेवी सुरक्षित राहतील का हा मोठा आणि गहण प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली आहे. तसेच या बँकेचे माजी संचालक व ठेवीदार धनराज असवानी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या बँकेचे प्रामाणिक आणि दक्ष अधिकारी सहनिबंधक राजेश जाधववार यांनीही आपल्या लेखा परीक्षण अहवालात बॅँकेकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात अनेक अनियमितता असल्याचं सांगितलं होत. मात्र बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदाणी यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे.
आता अमर मूलचंदाणी जरी सर्व अलबेल असल्याच सांगत असले तरीही त्यांना पोलीस तसच सहकार खात्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला आणि न्यायालयीन लढाईला आता तोंड द्यावं लागणार आहे. मात्र तोपर्यंत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत राहणार का असा प्रश्न बँक ग्राहकांनी उपस्थित केला आहे.