हदगाव बहुजननामा ऑनलाईन – संरक्षक भिंतीवरून उडी मारताना भिंतीवरील गज पोटात घुसल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तामसा येथील जि. प. प्रशालेत बुधवारी दुपारी घडली. दरम्यान याप्रकऱणी शाळा प्रशासनावर करण्याची मागणी त्याच्या पालकांनी केली आहे. जगदीश गजानन गजभारे (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जगदीश इयत्ता ८ वी च्या वर्गात शिकत होता. तो तमासा येथे आपल्या आजोबा पोलीस पाटील साहेबराव वाघमारे यांच्याकडे राहत होता. वर्गातील पहील्या रांगेत बसणारा एक हुशार विद्यार्थी म्हणुन त्याची शाळेत ओळख होती.
वर्ग शिक्षका एल.सी.जोशी यांनी सांगितले, २४ जुलै रोजी जगदीश हा दुपारच्या सिप्टच्या शाळेत आला होता. शाळा काही वेळातच भरणार असल्याने तो खेळत खेळत प्रशाळेच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन जात असताना भिंतीवरील गज त्याच्या पोटात आरपार घुसला. त्यानंतर रक्त बोंभाळ थारोर्यात सापडलेल्या जगदीशला पाहून विद्यार्थ्यानी आरडाओरडा केला. तेव्हा सर्व शिक्षकांनी जाऊन त्याला गजावरून खाली उतरवले. त्यानंतर त्याला तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा दुर्देवी अंत झाला. घटनेची वृत्त वार्यासारखे तामसा शहरात धडकताच विद्यार्थ्याच्या दुर्देवी मृत्यु बद्दल शहरात शोककळा पसरली होती.
घडलेली दुर्देवी घटना ही प्रशासनाच्या दुर्लक्षाने आणि निष्काळजीपणाने घडली जगदीशच्या यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्यांनी शाळा प्रशासनावर कडक कार्यवाही केल्याशिवाय शवविच्छदन होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. प्रथम हे वृत्त कळताच भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुदीराज, हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक रामराव गाडेकर यांनी धाव घेतली. त्यानंतर शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर ,उपशिक्षण अधिकारी बंडु आमदुरकर, हदगावचे गटशिक्षण अधिकारी ससाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एल. कदम, नायब तहसिलदार जी. डी. हाराळे, मंडळ अधिकारी संजय बिर्हाडे, तलाठी आर. डी. जाधव तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामराव जगाडे आदीनी भेट दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी वाठोरे हे होते.