नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – देशभरात निर्भया सामूहिक बलात्काराबद्दल चर्चा असताना अशा घटनांबाबत जनजागृती सुरु आहे. परंतु नांदेडमध्ये एका शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमधील शंकरनगर येथे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांची शैक्षणिक संस्था असून तेथील सहशिक्षक रसूल सय्यद व दयानंद राजुरे यांनी अश्लील व्हिडिओ दाखवून एका विद्यार्थिनीवर दोन महिन्यांपासून अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. पीडित विद्यार्थिनीने घरी सांगितले असता शिक्षकांविरुद्ध रामतीर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तसेच आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद रसूल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील (मुख्याध्यापक) आणि धनंजय शेळके अशी अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे असून त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर चार शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत.
Visit : bahujannama.com