नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलीकॉम क्षेत्रात सध्या प्राइस वॉर सुरू आहे. तीन प्रमुख टेलीकॉम कंपन्या म्हणजे एअरटेल, जियो आणि वोडाफोन दररोज नवनवीन प्लान लाँच करत आहेत. नवनवीन प्लान हे अन्य कंपनीच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सादर केले जात आहेत. मोबाइल वापरणार्यांना कमी किमतीत जास्तीत जास्त डेटा हवा असतो, ज्यामध्ये 1 पासून 3 जीबी डेटापर्यंतचे प्लान असातात. आता वोडाफोन आयडियाने एक नवा प्लान लाँच केला आहे. वोडाफोन आयडियाने नवा 997 रुपयांचा लाँग टर्म प्रीपेड प्लान सादर केला असून प्लानमध्ये तुम्हाला रोज 6 महिन्यापर्यंत 1.5 जीबी डेटा मिळेल. या प्लानचे कॉलिंग आणि अन्य फायदे जाणून घेवूयात.
997 रुपयांत 6 महीन्यांची वॅलिडिटी
वोडाफोनच्या नव्या 997 रुपयांच्या प्लानची वॅलिडिटी 6 महीन्यांची आहे. यात तुम्हाला रोज 1.5 जीबी डेटा मिळेल. म्हणजे 997 रुपयांमध्ये एकुण 270 जीबी डेटा मिळेल. तसेच प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतील. या प्लानमध्ये वोडाफोन प्ले चे सब्क्रिप्शन मोफत मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला झी 5 प्रीमियम कन्टेंट मिळेल. याची वार्षिक किंमत 999 रुपये आहे. हा प्लान सध्या काही निवड सर्कलमध्येच उपलब्ध आहे. परंतु, वोडाफोन लवकरच तो सर्वत्र लाँच करू शकतो.
वोडाफोनचे दोन आणखी नवे प्लान
दोन दिवसांपूर्वीच वोडाफोनने 99 रुपये आणि 555 रुपयांचे प्लान्स आणले आहेत. वोडाफोनचा 99 रुपयांच्या प्लानला 18 दिवसांची वॅलिडिटी आहे. या प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबतच 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस सुद्धा वॅलिडिटीदरम्यान मिळतात. तसेच वोडाफोन प्ले आणि झी 5 सब्क्रिप्शनचा अॅक्सेस सुद्धा प्लानमध्ये मिळतो. 555 रुपयांच्या प्लान 71 दिवसांच्या वॅलिडिटीचा आहे. यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. सोबतच ग्राहक अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि झी 5 चे सब्सक्रिप्शन मिळते.
150 रुपयांपेक्षा कमी रोज 1 जीबी डेटा
जर तुम्ही कोणत्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल तर रिलायन्स जिओच्या 149 रुपयांच्या प्लानमध्ये रोज 1 जीबी डेटा मिळेल. 150 रुपयांपेक्षा कमीच्य प्लानमध्ये रोज 1 जीबी डेटा मिळत आहे. या प्लानची वॅलिडिटी 24 दिवसांची आहे. म्हणजे 149 रुपयांत एकुण 24 जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये रोज 100 एसएमएस मिळतात. कॉलिंगबाबात बोलायचे तर जिओ वर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. पण दुसर्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 300 मिनिटच मोफत मिळतील. त्यानंतर कॉल केल्यास टॉकटाइम रिचार्ज करावा लागेल. ज्यामध्ये प्रति मिनिट 6 पैशांचा चार्ज लागेल.
Visit : bahujannama.com