नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना संसर्गितांची रुग्णसंख्या १ कोटी ५५ हजार ५६० वर पोहचली असून, ९६ लाख ६ हजार १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ४५ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “जानेवारी २०२१ मध्ये कोणत्याही आठवड्यात देशात कोरोनाची पहिली लस दिली जाईल. लसीच्या दर्जाबाबत सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. जनतेस उत्तम दर्जाची लस टोचवण्यात येईल.”
#WATCH | Our first priority has been safety & effectiveness of vaccines. We don't want to compromise on that. I personally feel, maybe in any week of January, we can be in position to give first COVID vaccine shot to people of India: Union Health Minister Dr Harsh Vardhan to ANI pic.twitter.com/PEtMgqptYJ
— ANI (@ANI) December 21, 2020
कोरोना प्रतिबंध लस प्राधान्याने कोणाला टोचवायची यासंदर्भात निर्णय घेतले असल्याचे सांगत डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं, “देशात ३० कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल. त्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैन्य दलातील कर्मचारी, स्वच्छता कामगार, पन्नाशी पार केलेलं नागरिक आणि पन्नाशी पार न केलेले पण गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या नागरिकांचा समावेश आहे.”
After consultation with experts, we've prioritized 30 crore people for COVID vaccine. It includes health workers, frontline workers like police, military & sanitation staff, people above 50 yrs & those who are below 50 yrs but are suffering from certain diseases: Health Minister pic.twitter.com/fhGqqEwiuc
— ANI (@ANI) December 21, 2020
कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यावी, असा सरकारचा प्रयत्न असेल. परंतु, एखाद्याने टोचून न घेण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही. लसीकरणासाठी जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण सुरु आहे. आजवर २६० जिल्ह्यांत २० हजार जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे, डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. दरम्यान, आताच्या स्थितीला ६ लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. देशभरात या चाचण्या सुरु असल्याचे, आरोग्य मंत्रालयाने म्हटलं.
We've formed task forces at state, district & block levels. Thousands of master trainers have been trained across the country. We've conducted training at state level & trained over 20,0 00 workers in about 260 districts: Union Health Minister Dr Harsh Vardhan on vaccination https://t.co/X3VVeRtxf7
— ANI (@ANI) December 21, 2020