बहुजननामा : ऑनलाईन – जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधात मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात विद्यार्थी, राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तीही सहभागी होते. तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही सहभागी होते. जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर आक्षेप घेत भाजपचे किरीट सोमय्या यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही सहभागी झाले होते.
I lodge complaint with Colaba Police Station against Minister Jitendra Awhad of Thackeray Sarkar, for leading illegal, anti national "Kashmir ko Chahiye Azadi" demonstrations. Police said no permission was given for the demonstration I demand Action against Minister @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 7, 2020
या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशी घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आलं असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. तक्रार केल्यावर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली.