बहुजननामा ऑनलाइन टीम – सरकार योजना आणि धोरणांबद्दल केंद्र सरकार वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देत राहतात. परंतु आता यूट्यूब व्हिडिओने दावा केला आहे की, केंद्र सरकारने ‘विधवा महिला समृध्दी योजना’ आणली आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार विधवा महिलांना पाच लाख रुपये रोख आणि एक शिवणकामाची मशीन देत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना हे माहित असणे आवश्यक झाले आहे की, केंद्र सरकार खरोखर अशी योजना चालवित आहे का? सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केली नाही तर या दाव्याचे सत्य काय आहे?
केंद्र सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा यूट्यूब व्हिडीओ आणि त्यात केलेले दावे बनावट म्हटले गेले आहेत. म्हणूनच आपण अशा कोणत्याही बनावट बातम्यांपासून दूर राहणे महत्वाचे आहे, अन्यथा आपल्याला प्रचंड नुकसान सहन करावे लागू शकते.
दावा: एक #Youtube वीडियो में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार 'विधवा महिला समृद्धि योजना' के तहत सभी विधवा महिलाओं के बैंक खाते में 5 लाख रुपये की नकद राशि एवं फ्री सिलाई मशीन दे रही है। #PIBFactcheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/hDplDHh9eb
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 10, 2020
या व्हिडिओमध्ये काय दावा केला जात आहे?
या व्हिडिओमध्ये असा दावा केला गेला आहे की, मोदी सरकारने विधवा महिलांसाठी ‘विधवा महिला समृद्धी योजना’ आणली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार सर्व विधवा महिलांना पाच लाखांची रोख रक्कम आणि एक शिवणकामाची मशीन विनामूल्य देत आहे.
खरे सत्य काय आहे?
पीआयबीचे अधिकृत ट्विट हँडल – पीआयबी फॅक्टचेकवर व्हायरल झालेल्या या पोस्टचे बनावट वर्णन केले आहे. हा दावा बनावट असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘विधवा महिला समृद्धी योजना’ यासारखी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवित नाही.
याआधीही अनेक यूट्यूब व्हिडीओ व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारी योजनांच्या नावावर बनावट गोष्टी बनवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी एका युट्यूब व्हिडिओने दावा केला आहे की, केंद्र सरकार ‘महिला शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 60,000 रुपये हस्तांतरित करीत आहे. पीआयबी फॅक्टचेकनेही हा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने स्पष्टीकरण दिले की, महिलांसाठी अशी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवित नाही.
आपल्यालाही जर कोणता मेसेज आल्यास आपण ते पीआयबीला https://factcheck.pib.gov.in/ वर किंवा व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 वर पाठवू शकता किंवा वस्तुस्थिती तपासणीसाठी ईमेल: pibfactcheck@gmail.com ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.