धुळे : बहुजननामा ऑनलाइन – समस्त मराठा समाज वधू-वर पालक परिचय मंडळातर्फे मराठा समाजातील निर्वाचित नगरसेवक, नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, मराठा समाज मिरच्या मारुती पंच मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सुधाकर बेंद्रे, भटू वाघारे उपस्थित होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते निर्वाचित नगरसेवक शीतल मोहन नवले, राजेश ईश्वर पवार, कमलेश नारायण देवरे, संजय रामदास पाटील, युवराज चैत्राम पाटील, कांतीलाल माणिकराव दाळवाले, रावसाहेब आनंदराव पाटील, नगरसेविका वंदना राजेंद्र मराठे, सुरेखा भागवत देवरे, विमलबाई गोपीचंद पाटील, ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील, नीशा प्रमोद पाटील, मंगला सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराच्या कार्यक्रमानंतर डॉ. भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन नगरसेवकांनी निवडून आल्याबरोबर सुरु केलेल्या कामांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. तसेच, धुळे शहराच्या विकासासाठी त्यांनी मंजूर करुन आणलेल्या कामांची माहिती दिली. प्रास्ताविक, संजय मराठे यांनी केले.
कार्यक्रमासाठी समस्त मराठा समाज वधू-वर परिचय मंडळाचे अध्यक्ष नैनेश साळुंके, शंकरराव मराठे, तुळशिराम म्हस्के, मनोज मराठे, वसंत बागूल, तुकाराम बागूल, प्रकाश पवार, रमेश कदम, दिनेश काळे, शाम रायगुडे, भरत वाघारे, किरण मराठे, प्रफुल्ल माने, हेमंत चव्हाण, सर्जेराव इथापे, अमर फरताडे, गिरीश चव्हाण, शशीकांत मराठे, चंद्रकांत थोरात, विवेक बागूल, विनोद रायगुडे, रजनिश निंबाळकर, संदीप सूर्यवंशी, अनिल जगताप, देविदास मोरे, सुनिल वर्पे, महेंद्र रगडे, नानाभाऊ कदम, नीलेश काटे, मुन्ना शितोळे, संजय मराठे, अर्जून पाटील, कुणाल फरताडे आदींनी परिश्रम घेतले