बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : गॅरंटेड आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये एफडी(FD), पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या समृद्धी योजना सर्वात जास्त लोकप्रिय आहे या गुंतवणूक योजनांमध्ये रिटर्न कमी असला, तरी येथे ग्राहाकांची गुंतवणूक सुरक्षित राहाते. अशा पर्यायांपैकी अनेकांमध्ये गुंतवणुकदारांना गुंतवणुकीतून प्राप्त उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो. तर, यापैकी काही गुंतवणूक पर्याय असे सुद्धा आहेत, जेथे तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात.
1 फिक्स डिपॉझिट (FD) :
फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीतून प्राप्त व्याजावर बँक 10 टक्के टीडीएस कापते. जर तुम्ही उच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर तुम्हाला अतिरिक्त टॅक्स द्यावा लागू शकतो.
2 पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) :
पीपीएफ योजना एएए स्टेटससह येते. म्हणजे यामध्ये तीन ठिकाणी टॅक्स लाभ मिळतो. या योजनेत, व्याज उत्पन्न आणि मॅच्युरिटीच्यावेळी मिळाणारी रक्कम, तिनही टॅक्स फ्री असते. या योजनेत प्राप्तीकर कायदा कलम 80सी अंतर्गत टॅक्स सवलतीचा लाभ मिळतो.
3 नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (एनएससी) :
एनएससीमध्ये करण्यात आलेली गुंतवणूकसुद्धा प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत करसवलतीसाठी पात्र असते. या सर्टिफिकेट्समध्ये गुंतवणुकीतून प्राप्त व्याज करसवलतीसाठी पात्र असते. येथे गुंतवणुकीतून प्राप्त उत्पन्न मॅच्युरिटीचे वर्ष सोडून, वस्तूत: करममुक्त असते.
4 सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) :
पीपीएफप्रमाणे या योजनेत सुद्धा मॅच्युरिटी दरम्यान गुंतवणुक करण्यात आलेल्या रक्कमेवर व्याज टॅक्स फ्री असते. या योजनत केलेली गुंतवणूक प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सीच्या अंतर्गत करसवलतीस पात्र आहे.