बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरातील विविध भागांतून वाहने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी(Pune) सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस(Pune) आणत 1 लाख 20 हजार रुपयांच्या 4 दचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
रवींद्र राया इंदुलकर (वय 31, रा. कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरात घरफोड्यासोबत वाहनचोरीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही केल्या या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान अलंकार पोलीस वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. सीसीटीव्ही पडताळणी करण्यात येत होती. तसेच बतमीदारामार्फत माहिती घेत असताना कर्मचारी राजेंद्र लांडगे व नीलेश शिर्के यांना मिळालेल्या माहितीवरून रवींद्र याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. सखोल तपासात त्याने विविध भागांतून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत 1 लाख 20 हजार रुपयांच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सयाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सहाय्यक उपनिरीक्षक तन्वीर शेख, कर्मचारी नीलेश शिर्के, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, किरण राऊत, हरी गायकवाड यांनी केली.