बहुजननामा ऑनलाईन टीम – या लग्नाच्या सीझनमध्ये तुम्हालाही आपल्या लूक आणि मेकअपवर प्रयोग करायचा असेल तर कॅटरिना कैफकडे तुमच्यासाठी उत्तम टिप्स आहेत. बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रीने गेल्या वर्षी तिच्या चाहत्यांसमोर तिच्या थ्रीडी ओठमागचे रहस्य उघडले होते. तिच्यासारखे थ्रीडी ओठ कसे मिळवता येईल हे अभिनेत्रीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून उघड केले होते. तिने सविस्तरपणे याबाबत साांगितले. कॅतरिनाने लिहिलेःमाझ्यासारखे 3D लिप लुक कसे मिळवाल!
फस्ट स्टेप : सर्वप्रथम, परिपूर्ण आकार देण्यासाठी गडद रंगात मॅट अॅक्शन लिप पेन्सिल वापरा.
सेकंड स्टेप : यानंतर, ओठांना बोल्ड करण्यासाठी मॅटीनी लिप क्रेयॉन कॉम्बिनेशनच्या कोणत्याही हलक्या शेडसह ओठ भरा.
थर्ड स्टेप : आपल्या ओठांच्या दरम्यान थोडासा मॅस्ट्रो लिप टॉपर ठेवा. त्यामूळे आपले ओठ हायलाईट तसेच पाउट आणि फूल दिसतील.
माझ्यासारखे दिसण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे :
मॅट अॅक्शन लिप पेन्सिल – हिपनॉटिक
मॅटीनी लिप क्रेयॉन – फ्रेटर्निटी
मेस्ट्रो लिप टॉपर – स्टार्लेट
दरम्यान, 36 वर्षीय अभिनेत्रीने गेल्या वर्षी ब्यूटी ब्रँड नायका सोबत KayByKatrina नावाचा मेकअप ब्रँड लॉन्च केला होता. लॉन्च करताना कतरिना म्हणाली की माझा विश्वास आहे की मेकअप तुम्हाला सुंदर बनवू शकत नाही. आम्ही आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या सौंदर्यास हायलाईट आणि वाढविण्यासाठी मेकअप वापरू शकतो. मला वाटते की प्रत्येक स्त्री सुंदर आणि वेगळी आहे.
कतरिना कैफच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना ती लवकरच ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.