Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार

बहुजननामा ऑनलाईन टीम – पाठदुखी (Back Pain) ही अशीच एक समस्या आहे ज्याचा सामना प्रत्येक माणसाला कधी ना कधी करावाच लागतो. या समस्येची अनेक कारणे (Causes Of This Problem) आहेत जसे की खराब पॉश्चर तणाव स्नायूंचा ताण (Bad Posture, Stress, Muscles Pain) आणि चमक, जुन्या दुखापतीमुळे देखील कधीकधी पाठदुखी (Back Pain) होते. पण कधी-कधी ज्या वेदनांना आपण पाठदुखी समजतो, ते दुखणे किडनीमुळेही होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किडनीमुळे होणारी वेदना मणक्याच्या कोणत्याही भागात, मागच्या बाजूला बरगडीखाली होते. किडनीच्या संसर्गामुळे किंवा किडनी स्टोनमुळे (Kidney Stone) पाठदुखीची तक्रार असते. तुम्ही देखील किडनीच्या दुखण्याला पाठदुखी समजत नाही का? जर तुम्हाला वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल तर हे दुखणे ओळखा.
किडनी दुखणे आणि पाठदुखी कशी ओळखावी (How To Recognize Kidney Pain And Back Pain) :
किडनी पाठीकडे बरगड्यांच्या खाली असते, त्यामुळेपाठदुखी आणि किडनीचे दुखणे कोणते हे सांगणे कठीण असते. हे लक्षणांवरून ओळखता येऊ शकते. वेदना कोणत्या आहेत हे ओळखण्यासाठी दुखण्याची जागा, त्याचा प्रकार आणि गांभीर्याकडे लक्ष दिले पाहिजे.
किडनीचे दुखणे कसे ओळखावे (How To Recognize Kidney Pain) :
किडनीच्या वेदना (Kidney Pain) सहसा किडनीच्या संसर्गामुळे होते किंवा किडनीतून बाहेर पडणार्या ट्यूबमध्ये स्टोन आल्याने होते.
किडनीच्या वेदना कुठे होतात (Where Kidney Pain Occurs) ?
किडनीची वेदना ओटीपोटात (Pelvis) जाणवते. जो तुमच्या मणक्याच्या हाडाखाली आणि कूल्ह्यांच्या मधील भाग आहे. ही सामान्यपणे शरीराच्या एका बाजूला होते, परंतु ती दोन्ही बाजूंना सुद्धा होऊ शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वेदनांचे प्रकार (Types Of Pain) :
– किडनीत स्टोन असल्यास किडनीचे दुखणे तीव्र असते आणि संसर्ग झाल्यास सौम्य वेदना होतात. बहुतेक वेळा ते स्थिर असेल.
– शरीरात हालचाल असताना ही वेदना फारशी होत नाही. उपचाराशिवाय या वेदनापासून मुक्त होणे कठीण असते.
– जर तुमच्या किडनीमध्ये स्टोनची तक्रार असेल, तर स्टोन हलल्यावर वेदनांमध्ये चढ-उतार होऊ शकतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- back pain correlated to kidney know how to identify both symptoms
हे देखील वाचा :
Comments are closed.