पुणे : बहुजननामा ऑनलाईन – इयत्ता अकरावी प्रवेशाची नियमित दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झालीय. 23 हजार 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात दि. 9 डिसेंबर 2020 पर्यंत प्रवेश घ्यावा लागणाराय. दुसर्या फेरीत सर्वाधिक 10 हजार प्रवेश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळालेत.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जातेय. या प्रक्रियेतील पहिली फेरी काही दिवसांपुर्वीच पूर्ण झाली होती. पण, मराठा आरक्षणासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झालीय.
पहिल्या फेरीमध्ये एकूण 30 हजार 544 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत. दुसर्या फेरीत एकूण 60 हजार 599 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 46 हजार 714 विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यातून गुणवत्तेनुसार 23 हजार 120 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केलीय. त्यामध्ये 10 हजार 89 विद्यार्थी विज्ञान शाखेतील तर 9 हजार 762 विद्यार्थी वाणिज्य शाखेतील आहेत. एकूण अर्जांपैकी 50 टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केलीय. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार पहिल्या पसंती दिलेल्या 8 हजार 929 विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळणाराय.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि.9 डिसेंबर 2020 पर्यंत संबंधित महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द व नाकारताही येऊ शकतो. तसेच पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येईल. प्रवेशाची नियमित तिसर्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती दि. 10 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर केली जाईल.
दुसर्या फेरीची प्रवेशाची स्थिती :
शाखा उपलब्ध जागा अर्ज निवड झालेले विद्यार्थी :
कला 10,075 4,351 2,672
वाणिज्य 24,052 20,348 9, 762
विज्ञान 23,170 21,192 10,089
व्होकेशनल 3,302 903 597
एकूण : 60,599 46,794 23,120
पसंतीक्रमानुसार झालेली निवड पसंतीक्रम विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
1 8,929
2 4,147
3 2,853
4 2,064
5 1,612
आतापर्यंत निश्चित झालेले प्रवेश :
कोटा प्रवेश क्षमता झालेले प्रवेश :
इनहाउस 7487 4117
मॅनेजमेंट 4720 549
अल्पसंख्याक 10683 2337
कॅप 84140 23541
एकूण 107030 30544