Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या
बहुजननामा ऑनलाईन टीम – Immune System In Summer | सध्या उन्हाळा (summer season) कडक आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या (Today Temperature) पुढे गेले आहे. कडक उन्हामुळे सतत घाम येतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे (Summer Care Tips) शरीरातील पाण्याची (Body Hydration Tips) घट होते, तसेच इतर अनेक समस्यांनाही शरीर बळी पडते (Immune System In Summer).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उष्णतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, डिहायड्रेशनची समस्या (Headache, Dizziness, Dehydration Problem) शरीराला सर्वात जास्त कमकुवत करत आहे. या ऋतूमध्ये आहार (Summer Diet) योग्य नसल्यास इम्युनिटी कमी होऊ लागते (Immune System In Summer).
इम्युनिटी (immunity) कमकुवत होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अशा पदार्थांचे सेवन करणे ज्याने पोट भरते आणि आपली इम्युनिटी कमकुवत होते. कमकुवत इम्युनिटीमुळे, सामान्य सर्दी (Cold) आणि फ्लू (Flu) सारखे रोग प्रथम होतात. उन्हाळ्यात इम्युनिटी मजबूत करण्यासाठी, सर्वप्रथम आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा आणि आहारातून अनहेल्दी पदार्थ वगळा (Unhealthy Food And Healthy Food).
फास्ट फूड कमजोर करतात इम्युनिटी (Fast Food Weaken Immune System) :
फास्ट फूड खाल्ल्याने इम्युनिटी झपाट्याने कमी होते. चिप्स, कँडी, बर्गर, पिझ्झा, चाऊमीन आणि तळलेले पदार्थ इम्युनिटी झपाट्याने कमकुवत करतात. फास्ट फूडमध्ये कॅलरी, फॅट आणि सोडियमचे (Calories, Fat And Sodium) प्रमाण जास्त असते ज्यामुळे इम्युनिटी कमकुवत होते. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते, ते खाल्ल्याने चरबी आणि लठ्ठपणा (Obesity) वाढतो.
उन्हाळ्यात कॉफी कमी करू शकते इम्युनिटी (Coffee Weaken Immune System) :
उन्हाळ्यातही तुम्ही कॉफीचे जास्त सेवन करत असाल तर ही सवय लगेच बदला. कॉफीमुळे इम्युनिटी कमकुवत होते. कॉफीमध्ये कॅफिन (Caffeine) असते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतोच शिवाय तुमची इम्युनिटी सुद्धा कमकुवत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पॅकेज फुडमुळे पडू शकता आजारी (Packaged Food Can Make You Sick) :
उन्हाळ्यात बाजारातील पॅकेज फूड अजिबात वापरू नका. पॅकेज फूडमुळे इम्युनिटी झपाट्याने कमी होते. जर तुम्ही उन्हाळ्यात डब्बाबंद ज्यूस, दही, लस्सी आणि ताक यांचे सेवन करत असाल तर त्यांचे सेवन कमी करा आणि त्याऐवजी ताज्या रसाचे सेवन करा.
डब्बाबंद अन्न तुमच्या इम्युनिटीवर वाईट परिणाम करते. यामध्ये असलेले रिफाइन्ड कार्ब्ज इम्युनिटी खराब करतात.
आईसक्रीम (Ice-cream) :
उष्णतेपासून वाचण्यासाठी जर तुम्ही जास्त आईस्क्रीम खात असाल तर ते टाळा.
आईस्क्रीममध्ये फुल फॅट क्रीम (Full Fat Cream) आणि दूध (Milk) असते ज्यात सॅच्युरेटेड फॅट (Saturated Fat) जास्त असते.
उन्हाळ्यात आईस्क्रीमच्या अतिसेवनाने इम्युनिटी कमकुवत होते.
इम्युनिटी मजबूत करण्यासाठी काय खावे (Immunity Booster Food) :
हिरव्या भाज्या, मशरूम, पपई, फ्लॉवर, आले, आवळा, तुळशीची पाने, हळद, जिरे, जवस
(Green Vegetables, Mushrooms, Papaya, Cauliflower, Ginger, Amla, Basil Leaves, Turmeric, Cumin, Flax) इत्यादी इम्युनिटी वाढवतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Immune System In Summer | 5 foods that may weaken your immune system in summer
हे देखील वाचा :
Shankar Maharaj Math | शंकर महाराज समाधी मठास ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे कार्डीॲक रुग्णवाहिका प्रदान
Comments are closed.