नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात छोटं घर लोकांसाठी चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. बुराडी परिसरातील हे 6 यार्डाचे छोटेसे घर पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत. आजूबाजूच्या लोकांचंही म्हणणं आहे की, हे घर खूप लोकप्रिय होत आहे. येथे येणारे लोक घराचे फोटो काढून निघून जातात.
खास बात अशी की, या घरात, एक बेडरूम, किचन, बाथरुम, शिडी आणि छप्पर आहे. याला असं डिझाईन केलं आहे की, ग्राऊंड फ्लोरवर शिडी आणि बाथरुम आहे. वर चढलं की, पहिल्या मजल्यावर एक बेडरूम आहे. दुसऱ्या मजल्यावर एक किचन आहे. आणि नंतर खुले छप्पर म्हणजेच टेरेस आहे.
या घरात राहणारी पिंकी सागंते की, याला खूप सुंदर पद्धतीने बनवले गेले आहे. पूर्ण घरात वरपासून खालीपर्यंत संगमरवर टाकलं गेलं आहे. पिंकी आपले पती आणि दोन मुलांसोबत या घरात राहते. पूर्ण कुटुंबाला या छोट्या घरात राहण्यासाठी कोणतीही अडचण नाही. या घराचं भाडं 3500 रुपये प्रतिमहिना आहे. पिंकी सांगते की, घर छोटं असलं तरी लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लोकांना नवल वाटतं की या घरात 4 लोक कसे राहतात.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी