• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Facebook, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही ‘दणका’ ; आता ‘YouTube’ अकाऊंटही केलं बंद

by sajda
January 13, 2021
in देश- विदेश
0
Trump

Trump

बहुजननामा ऑनलाइन टीम – FB, Twitter पाठोपाठ अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता Google ने ही दणका दिल्याची माहिती (Trump)समोर येत आहे. ट्रम्प यांचे YouTube अकाऊंट आता बंद करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएपपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे. असं यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. या चॅनेलवरुन आता किमान सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही. असंही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. सध्याचे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे
२० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत.

अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर जागतिक महासत्तेचे मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असं म्हटलं होतं.

..’यांनी घेतली ट्रम्प यांच्यापासून फारकत’

अमेरिकेतील स्ट्राईप या ऑनलाईन पेमेंट सेवाप्रदात्या कंपनीने ट्रम्प यांच्याशी संबंधित व्यवहार थांबविले आहे. हे संकेतस्थळ अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्यासाठी प्रचार व प्रसार मोहिम आखत असे. शॉपिफाय तसेच गोफंडमी या ऑफलाईन व्यापार मंचानेही ट्रम्प यांच्यापासून फारकत घेतली आहे. गोफंडमी ही निधी उभारणी करणारी कंपनी आहे. ही कंपनी ट्रम्प समर्थकांच्या प्रवासाचे व्यवहार बघत असे.

Tags: FacebookGoogleTrumptwitterअकाऊंट
Previous Post

Pune News : विरोध झुगारून वेल्ह्यात गुंजवणीच्या पाईपलाईनचे काम सुरु

Next Post

88व्या अभिष्टचिंतन सोहळयापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून नेलं मुळगावी अन् जंगी मिरवणूक

Next Post
88th Abhishtachintan ceremony

88व्या अभिष्टचिंतन सोहळयापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून नेलं मुळगावी अन् जंगी मिरवणूक

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आ. पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही अन् तो मी वाचत नाही’

6 days ago

‘फेसबुक-ट्विटर’ असो की नेटफ्लिक्स-Amazon, सर्वांसाठीच बनवली गेली कठोर नियमावली; न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार, 3 स्तरावरून असणार ‘लक्ष’

3 days ago

‘लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’, अनिल देशमुखांचा इशारा

5 days ago

थायराॅईड पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक, जाणून घ्या

15 hours ago

Drishyam 2 Review : मोहनलालच्या सस्पेन्सनं पुन्हा जिंकले मन, चुकवू नका ही शानदार मर्डर मिस्ट्री !

5 days ago

‘उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे’, आठवलेंची बोचरी टीका

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat