बहुजननामा ऑनलाइन टीम – फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि 24 ऑक्टोबर (शनिवार) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते जे सोशलवर खूप व्हायरल झाले होते. एक काळ असा होता जेव्हा नेहा आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांश कोहली (Himansh Kohli) यांचं ब्रेकअप झालं होतं तेव्हा या ब्रेकअपची अनेक दिवस चर्चा सुरू होती. अशातच सोशलवर एक पोस्ट समोर आली ज्यात असं सांगितलं गेलं की, नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश नेहाची माफी मागत आहे. ही पोस्ट हिमांशनं पाहिल्यानंतर त्यानं संताप व्यक्त केला आणि व्हायरल पोस्टमधील व्हिडिओचं सत्यदेखील त्यानं सांगितलं आहे.
हिमांशनं इंस्टा स्टोरीला 2 पोस्ट शेअर केल्या आहेत. यात त्यानं माफी मागण्याच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य केलं आहे. त्यानं याचे स्क्रीनशॉट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. हिमांशनं लिहिलं की, सोशलवरील अशा प्रकारच्या कंटेटवर बॅन कधी लावला जाईल याबद्दल मी हैराण आहे. अशा प्रकारे बकवास केल्याचा कुणाला फायदा होणार आहे. सर्वांत जास्त परेशान करणारी बाब अशी आहे की, लोक याला आणखीच शेअर करत आहेत. प्लिज जागे व्हा आणि अशी घृणा व फेक पोस्ट पसरवणाऱ्या लोकांना थांबवा.
नेहा कक्कड़ से एक्स बॉयफ्रेंड ने मांगी माफी? हिमांश कोहली ने फेक पोस्ट पर जाहिर किया गुस्सा pic.twitter.com/quGEuSloZx
— TimePass (@TimePassTalks) November 12, 2020
हिमांशनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या अफवांवर आक्षेपही घेतला आहे.