बहुजननामा ऑनलाईन – नुकतीच भाजप कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीतनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा तुम्हीच (पत्रकार) करत आहे, जेणेकरून पक्षाचे नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीच वागणार नाहीत. कार्यसमितीच्या बैठकीला ते पूर्णवेळ हजर होते. तुम्हीच पत्रकार त्यांना इकडेतिकडे ढकलत आहे, पण ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत असेही चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल जे अनुद्गार वक्तव्य केले ते योग्य नाही आहे असे सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.