बहुजननामा ऑनलाइन टीम – जळगाव : भाजपचे नाराज नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे(Eknath Khadse) येत्या शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता प्रवेश होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाबाबत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट्वीट करत पाटील यांच्या मुद्द्याला आपला पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षपणे काल दर्शवून दिले आहे.
मोदी हे अनेकदा रात्री आठच्या सुमाराला देशाला मार्गदर्शन करत असतात. पण काल त्यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. अनेकांना वाटले काही तरी मोठी घोषणा होणार आहे. पण प्रत्यक्षात कोणतीच घोषणा न देता कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींचे भाषण सर्वसाधारणतः २० ते २५ मिनिटांचे असते. पण कालचा संदेश पाच मिनिटांतच संपला.