मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांसोबत काम करण्यासाठी पाच कार्याध्यक्षांची निवड केली आहे. त्याच धर्तीवर मुंबई कॉंग्रेससाठीही कार्याध्यक्षांची नेमणूक कॉंग्रेसने केली आहे. आता मिलिंद देवरा यांच्यासोबत आता माजी खासदार एकनाथ शिंदे हे मुंबईची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची नेमणूक मुंबईच्या कार्याध्यक्षपदी केली आहे.
राज्याच्या प्रदेश समितीत पाच कार्याध्यक्षांची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर मुंबईसाठीही कार्याध्यक्षांची निवड करण्याची मागणी मुंबईचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केली होती. त्यानंतर ही नेमणूक केली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा देत पक्षाला आलेली मरगळ झटकली आहे. एकट्यावर भार पडू नये, प्रमुख घटकांना प्रदेशांना न्याय देता यावा. या उद्देशाने थोरातांसोबत पाच कार्याध्यक्ष नेमले आहेत. तशीच रचना मुंबई प्रदेश कॉंग्रेसमध्ये करावी अशी इच्छा मिलींद देवरा यांनी बोलून दाखवली होती.
त्यांनी वर्षा गायकवाड, अमिन पटेल, भाई जगताप यांना मुंबईसाठी कार्याध्यक्ष म्हणून नेमावं अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. परंतु वरिष्ठांनी ज्येष्ठत्वाचा निकष लावत एकनाथ गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
https://twitter.com/ANI/status/1154736224843776000