बहुजननामा ऑनलाइन टीम : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन (DRDO) ने मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या पदावर नोकरीची भरती काढली आहे. बर्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या सविस्तर….
पदाचे विवरण
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या 1817 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन पहा.
पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात.
अर्ज फी किती आहे
जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १०० रुपये आणि अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेच शुल्क आकारले जाणार नाही.
वयाची अट
किमान वयोमर्यादा 18 व कमाल वयोमर्यादा 20 वर्षे निश्चित केली आहे. राखीव वर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. ज्यासाठी अधिसूचना पहावी लागेल.
या महत्त्वाच्या तारखा आहेत
अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 23 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2020
अर्ज कसा करावा
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत त्यांनी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकता
कशी होणार निवड
उमेदवारांची निवड संगणक बेस्ट परीक्षा (स्क्रीनिंग) आणि टियर 2 (अंतिम चाचणी) च्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 18000 ते 56,900 रुपये पगार देण्यात येईल.
Visit : bahujannama.com