नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला आणि बालविकास मंत्रालयाने मागील वर्षी महिलांच्या सुरक्षेसाठी द सी बॉक्स वेबसाईट सुरू केली आहे. ज्या महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होते त्या महिला या वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकतात. येथे सरकारी आणि खासगी कंपनीत काम करणार्या सर्व महिला तकार दाखल करू शकतात. जर महिला तक्रार दाखल करत असतील तर त्यांना थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला जातो.
या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेबसाईटवर दाखल तक्रारींची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार कामाच्या ठिकाणी शोषण झाल्याच्या तक्रारीत महाराष्ट्र सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. केंद्राच्या माहितीनुसार एकुण 203 प्रकरणांचा निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणार्या महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या याच सी बॉक्समध्ये 82 प्रकरणे असून महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे. तर उत्तर प्रदेशातून 65 प्रकरणे असून या राज्याचा दुसरा क्रमांक आहे. दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या 50 आणि तामिळनाडूमध्ये 48 प्रकरणे समोर आली आहेत. काही राज्य अशी आहेत जेथून एकही तक्रार दाखल नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की येथे असे एकही प्रकरण घडलेले नाही. कारण, येथील महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
Visit : bahujannama.com