कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – प्राचार्य एम. आर. देसाई यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान कोल्हापूर आणि सीमाभागातील बहुजन समाज कधीही विसरू शकत नाही. शिक्षण हेच बहुजनांच्या सर्व समस्यांवरील उपाय हे ओळखून त्यांनी केलेले कार्य राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला दिशादर्शक ठरते, असे उद्गार शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचालित मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. आर. पाटील यांनी काढले. कागलचे पहिले आमदार प्राचार्य एम. आर. देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित इंग्लिश डे समारंभात ते बोलत होते. एम. आर. देसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इंग्रजी अध्यापिका बी. वाय. मुसाई यांनी मनोगत व्यक्त केले. इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते : पाचवी ते सातवी- समृद्धी भीमराव मेटील, यश भोई, सुधर्म माळी, सुमित आरेकर. आठवी- सुहानी पाटील, सानिका एकल, वैष्णवी सूर्यवंशी पाटील, सोहन देवळे. नववी- श्रुती महाजन, प्रतीक परीट, ऋतुजा मेंडके, आदित्य लोकरे यांना बक्षिसे देण्यात आली.
उपमुख्याध्यापक जे. डी. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, तंत्रविभागप्रमुख पी. बी. लोकरे, एस. बी. सूर्यवंशी, एस. बी. बोरवडेकर, वाय. ई. देशमुख, प्रा. पी. एस. पाटील, एस. व्ही. म्हेतर, व्ही.आर. गडकरी, महादेव कांबळे, ए. एच. भोई, समीर कटके, एम. बी. टेपुगडे, ए. एन. पाटील, एस. पी. खोत, आप्पा नाईक, पिंटू बोंडगे, जोतिराम खराडे, संपत कोळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी विजय सापळे हिने केले. उपमुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी आभार मानले.