मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ED summons | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केल्यानंतर आता अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता ईडी(ED) कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची काल चौकशी सुरु होती. चौकशीनंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याचबरोबर अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास आणखी घट्ट करण्यात येत आहे.
अनिल देशमुख हे सध्या मुंबईतच आहेत. त्यामुळे ते चौकशीला हजर राहणार का हे काही वेळातच समजणार असून त्यानंतर त्यांची चौकशी काही तास सुरु राहण्याची शक्यता आहे. चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देणार की त्यांना अटक होणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकणार आहे.
web title: ED summons | ED summons to Anil Deshmukh! What steps will the ED take today?
Bjp protest pune |भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आज वाहतुकीत बदल
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरले
Deshmukh Anil | 100 कोटींचे वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सहाय्यकांना अटक
Anil Deshmukh | ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘वसुली’ मंत्री काही दिवसातच तरूंगात जाणार’