नवी दिल्ली : वृत्त संस्था – MP Pragya Singh Thakur | भाजपाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) या नेहमीच वादग्रस्त विधान करून वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्यात ( Mumbai attack) शहीद झालेल्या एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे (Former ATS chief Hemant Karkare) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केेले आहे.
जे लोक करकरेंना देशभक्त(patriot) संबोधतात त्या करकरेंनी लोकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी शिक्षकांची बोटं छाटण्याचं काम केलं होतं. ज्यांनी मला इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिल त्या शिक्षकाची बोट करकरेंनी छाटल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे कुणासाठी केल होतं? आणि ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, अशी विचारणा साध्वी ठाकूर यांनी केली आहे.
सीहोर येथे एका कार्यक्रमात प्रज्ञा सिंह ठाकूर बोलत होत्या. देशात एक आणीबाणी (Emergency) माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी (Former Prime Minister Indira Gandhi) 25 जून 1975 रोजी लागू केली होती आणि दुसरी आणीबाणी तेंव्हा लागू झाली जेव्हा 2008 साली मालेगाव बॉम्ब ब्लास्ट(2008 Malegaon bomb blast) प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर(Sadhvi Pragya Singh Thakur)ला त्यांनी तुरुंगात टाकल, असे त्या म्हणाल्या. लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानतात पण मी तस मानत नाही. ते देशभक्त नव्हते. देशात जे वास्तवात देशभक्त असतात त्यांना देशभक्त मानल जात नाही, असे त्या म्हणाल्या.
web title: MP Pragya Singh Thakur | Sadhvi Pragya Singh Thakur’s controversial statement, said – ‘Hemant Karkare had cut off the finger of the teacher, he was not a patriot’
ED summons |अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स ! ED आज काय पाऊल उचलणार?, चर्चेला उधाण
Bjp protest pune |भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आज वाहतुकीत बदल
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरले