पुणे : – Bjp protest pune | भाजपाकडून शनिवारी कात्रज चौका(Katraj Chowk)त केल्या जाणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतुकी(Traffic by Pune Police) त बदल केला आहे. स्वारगेटकडून कात्रजला जाणाऱ्या वाहनांना नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता)Sinhagad Road व गांगधाम (मार्केटयार्ड) Gangdham, Marketyard मार्गे जावे लागणार आहे. वाहन चालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी हे आंदोलन होणार असून भाजपचे नेते या आंदोलनाला उपस्थित असणार आहेत. कात्रज येथील वाहतूक सकाळी १० पासून आंदोलन संपेपर्यंत बंद असेल. स्वारगेट(Swargate)कडून कात्रजकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवली केली जाणार आहे.
असा आहे बदल
मुंबईकडून कात्रजकडे येणारी वाहतूक नवले ब्रीजकडून सातारा रस्त्याने, कात्रज कोंढवा रस्त्याला जाणारी जड वाहने महामार्गावर एका बाजूला थांबवून ठेवली जाणार आहेत. तर, हलकी वाहने आणि दुचाकी कात्रज नऱ्हे(Katraj Narhe) रस्त्यावरील जिजामाता दत्तनगर भुयारी मार्गे(Jijamata Duttnagar subway) येथून कात्रज डेअरीमार्गे इच्छितस्थळी जातील.
कोंढवा – कात्रज(Kondhwa – Katraj)कडून मुंबईकडे जाणारी जड वाहने खडी मशीन चौक ते शत्रुंजय चौक या दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबवून ठेवली जाणार आहेत. तर, हलकी वाहने राजस सोसायटी चौक, कात्रज नाका, दत्तनगरमार्गे मुंबईकडे जातील. कात्रज घाटातून शहरात येणारी जड वाहने बाजूला थांबवून हलकी वाहने कात्रज नाका येथून दत्तनगर चौक, भुमकर चौक मार्गे महामार्गावर जातील. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केली आहे.
web title: Bjp protest pune | Against the backdrop of BJP’s Chakkajam agitation, Pune police today changed the traffic
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरले
Deshmukh Anil | 100 कोटींचे वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सहाय्यकांना अटक