मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा-कॉलेज बंद आहेत तर अनेक परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. आताच समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षत्त पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2020
सध्या NEET आणि JEE परीक्षेसंदर्भात सर्वत्र वादंग निर्माण झाले आहे. आज सोनिया गांधी यांच्या नेवृत्वाखाली झालेल्या 7 राज्यांच्या बैठकीत NEET आणि JEE परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. सुधारित वेळापत्रक पुढं जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.