बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीच्या प्रक्रियेत सीबीआयनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau (NCB) देखील जोडली गेली आहे. या संपूर्ण प्रकरणातील एनसीबी संचालक राकेश अस्थाना यांनी अंमलबजावणी विभागाच्या (ईडी) तपासणीचे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आणले आहेत. संचालक राकेश अस्थाना यांनी स्पष्टीकरण दिले की रिया चक्रवर्ती आणि सुशांतला ड्रग्स सप्लाई करण्याचे पुरावे ईडीला सापडले आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार एनसीबीचे संचालक म्हणाले की, “आम्हाला ईडीकडून मंगळवारी एक पत्र प्राप्त झाले आहे, ज्यात त्यांच्या चौकशीत आर्थिक पुराव्यांच्या आधारे पुरावे सापडल्याची माहिती आहे की, सुशांत आणि रियाला ड्रग्स सप्लाई करण्यात येत होते. सीबीआयकडे ड्रग्जची बाब उघडकीस आल्यानंतर आता एनसीबीही या प्रकरणाच्या चौकशीत सामील होणार आहे. तसेच ईडीच्या सूत्रांनी या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की रियाच्या टॅलेंट मॅनेजर जया साहा यांच्या चौकशी दरम्यान त्यांना समजले की ड्रग्सबाबत त्यांचे संभाषण झाले आहे. परंतु, या तिन्ही तपास यंत्रणांनी या प्रकरणात सामील झालेल्या कोणत्याही व्यक्तीने ड्रग्स घेतले आहेत की नाही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्स अप चॅटचे स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत, ज्यात ड्रग्जची बाब समोर आली आहे. अलीकडे रियाच्या काही चॅट (रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅट्स) समोर आल्या आहेत, ज्या आश्चर्यकारक आहेत. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार रिया चक्रवर्तीने या चॅटमध्ये बर्याच लोकांशी बोलेली आहे. पहिली चॅट रिया आणि गौरव आर्य यांच्यात आहेत. गौरव हीच व्यक्ती आहे ज्याला ड्रग डीलर सांगितल जात आहे. या चॅटमध्ये असे लिहिले आहे की, ‘जर आपण हार्ड ड्रग्सबद्दल बोललो तर मी जास्त ड्रग्स वापरली नाहीत.’ रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला हा मेसेज पाठविला होता. रियाने दुसर्या चॅटमध्ये गौरवशीही बोलले आहे. यामध्ये रिया गौरवला विचारते, ‘तुमच्याकडे MD आहे का?’ येथे MD म्हणजे ड्रग्स MDMA या संदर्भात येतो, जो खूप स्ट्राँन्ग मानला जातो.
सुशांत सुसाइड प्रकरणात रिया चक्रवर्तीची अडचण सतत वाढत आहे
तिसरी चॅट रिया आणि जया साहा यांच्यात आहे. ही चॅट 25 नोव्हेंबर 2019 रोजीची आहे. यात जया रियाला सांगते की मी तिला (श्रुतीला) कॉ-ॲर्डिनेट करायला सांगितले आहे. रिया प्रतिसादात म्हणाली, खूप खूप आभार. यानंतर जया म्हणाली, ‘हरकत नाही भाऊ, मला आशा आहे की हे मदतगार ठरेल. चौथ्या चॅटमध्ये जया रिया चक्रवर्तींला म्हणते, “चहा, कॉफी किंवा पाण्यात 4 थेंब घाल आणि ते प्यायला दे. त्याचा परिणाम पाहण्यासाठी 30 ते 40 मिनिटे थांबावे लागेल. ही चॅट 25 नोव्हेंबर 2019 रोजीची आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी म्हटले आहे की, ‘रियाने आयुष्यभर कधीही ड्रग्स घेतले नाही. ती कधीही तिच्या रक्त तपासणीसाठी तयार आहे. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयचे पथक अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना अटक करू शकते अशी बातमी येत आहे. सीबीआयचे दोन पथक तिच्या घरासाठी रवाना झाले आहेत.