बहुजननामा ऑनलाईन टीम : लंडनमधील एका नशेबाज, निर्दयी मातेने दीड वर्षाच्या चिमुकलीवर गरम पाणी ओतल्याने तासभर तडफडून मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने त्या निर्दयी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कैटी क्राउडर (वय 26 वर्षे) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या निर्दयी मातेचे नाव आहे. तर ग्रेसी क्राउडर असे मृत्यू पावलेल्या निष्पाप चिमुकलीचे नाव आहे.
या खटल्याच्या वेळी सरकारी वकील म्हणाले की, मुलीचा नैसर्गिक मृत्यू नव्हता. मुलीच्या अंगावर गरम पाणी ओतून मरेपर्यंत तब्बल एक तास त्याच तडफडणाऱ्या स्थितीत सोडले होते. खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश जेरेमी बेकर म्हणाले की, ही घटना अत्यंत खेदजनक व धक्कादायक आहे. ग्रॅसीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गरम पाणी ओतले, त्यावेळी ती त्याच गरम पाण्यात बसली होती. यामुळे, बाळाची त्वचा 65 टक्क्यांपर्यंत भाजली गेली, असे न्यायधीश म्हणाले.
मुलीचा मृत्यू तातडीने नाही, वैद्यकीय अहवालातून स्पष्ट
तसेच वैद्यकीय अहवालात असे समोर आले आहे की, मुलीचा तातडीने मृत्यू झाला नाही. मुलीने एक तासाने वेदना सहन केल्या त्यानंतर तिचा मृत्यू झाला. न्यायाधीश म्हणाले की, दुखापतीमुळे बाळाच्या रक्तवाहिन्यांमधील द्रव बाहेर पडला, ज्यामुळे मुलीच्या अवयवांनी कार्य करणे थांबवले आणि अखेर तिचा मृत्यू झाला. न्यायाधीश पुढे म्हणाले की, कोणतेही कारण असले तरी तुम्ही ताबडतोब ग्रॅसीला डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे होते. त्यामुळे तिचा जीव वाचला असता. तसेच तुम्ही जळवळच राहणाऱ्या आपल्या आई -वडिलांची मदत घेतली नाही आणि तुम्ही तुमच्या मुलीला असेच तडफडत सोडले.
कैटी क्राउडर मानसिक आजारी होती
न्यायाधीश म्हणाले की, मानसशास्त्र अहवाल लक्षात घेऊन क्रॉडर मानसिक तणावग्रस्त आणि मानसिकरित्या ग्रस्त होती असा निष्कर्ष काढला. ग्रॅसीच्या मृत्यूच्या वेळी क्रोडरने बऱ्यापैकी कोकेन सेवन केले होते, परंतु या गोष्टीचा अद्याप खुलासा झालेला नाही की, गरम पाणी ओतण्यापूर्वीच क्रोडरने ड्रग्ज सेवन केले होते का?. या महिलेस किंग्ज मिल हॉस्पिटलमधून अटक केली आहे. मात्र, क्रॉडरने मुलीच्या हत्येचा आरोप फेटाळून लावला. अटक आईने सांगितले की, त्यावेळी ती आपल्या कुत्र्यासाठी साफसफाई करीत होती.