पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात तरुणांनी पोलिसांवरच हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या असून, शिवाजीनगर व हडपसरला हा प्रकार घडला असून, पोलिसांवर हल्ला तर केल्याचं पण त्यांचे गणवेश फडण्यात आले आहेत. याप्रकरणी 9 जणांना अटक केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी योगिराज सोमनाथ बनकर (वय २३, रा. मांजरी, हडपसर), विनोद संजय कुदळे (वय २० रा. सातववाडी, हडपसर) आणि रोहत राजू शिंदे (वय २४, रा. गंगानगर हडपसर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई दीनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुत्नाळे तपास करीत आहेत.
दुसरी घटना हडपसर भागात घडली असून, भांडणे सोडविल्याचा राग मनात धरून पोलिस शिपायाला मारहाण केली आहे. तर गणवेश फडण्यात आला आहे. याप्रकरणी रशीद शेख (वय ४७), सलीम शेख (वय ५१), विक्रम रेड्डी (वय ३०), तरून्नुम शेख (वय ३६) , सायरा शेख (वय ४४) , अरबाज शेख (वय २१) यांना हडपसर पोलिसांनी अटक केले आहे. महेश मदने यांनी फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपुर्वी गोपाळपट्टी मांजरी परिसरात दोन गटात पैशांवरून वाद सुरू होते. त्यावेळी पोलीस शिपाई महेश मदने यांनी भांडणे सोडविली. त्याचा राग आल्यामुळे ८ जणांच्या टोळक्याने महेश यांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला आहे.